…म्हणून ‘आम्ही’ दोन पावले मागे घेतले! फक्त ‘या’ आगारातील कर्मचारी कामावर हजर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव आगारातील एस.टी.कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली असून इतर एस.टी. कर्मचाऱ्यांचा अद्याप संप सुरुच आहे.

येथील १७० कर्मचारी हजर झाल्याने या आगारातून बस विविध मार्गावर रवाना झाल्या. उर्वरीत कर्मचारी आज हजर होतील व सर्व बसच्या नियमितपणे फेऱ्या सुरु होतील अशी माहिती आगार व्यवस्थापकानी दिली. एस.टी.कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ८ नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन सुरु केले होते.

अखेर एसटीचे वरिष्ठ अधिकारी व आगार प्रमुख यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले शेवगाव आगारातून लालपरी रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

पहिली बस शेवगाव आगारातून अहमदनगरच्या दिशेने रवाना झाली तर पाथर्डी, पैठण, श्रीरामपूर,नेवासा,गेवराई या मार्गावरही बस धावल्या.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा मुळे प्रवाशांचे खूप हाल झाले,त्यातच विद्यार्थ्यांचा शाळा सुरु झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती.

खाजगी वाहन चालकांनी अव्वाच्या सव्वा दराने तिकिटाचे दर आकारल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी आर्थिक झळ बसत होती.

मात्र कुठेतरी प्रवाशांची होणारी अडवणूक व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि खाजगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवावी म्हणून आम्ही दोन पावले मागे घेत एसटी आगारातून बस सुरू केली आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News