विहिरीवरील कृषिपपं चोरून नेला !

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  शेतातील विहिरीवर असलेली विद्युत मोटार चोरट्यांनी चोरून नेली आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारात ही चोरीची घटना घडली आहे.

याप्रकरणी शेतकरी बाळासाहेब लहानबा जाधव (वय ६५) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जाधव यांची गुंडेगाव शिवारात गट नंबर १६४ मध्ये शेतजमीन आहे. त्यांच्या शेतातील विहिरीवरून कावेरी कंपनीची तीन एच.पी. क्षमतेची विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

या मोटारीची किंमत सुमारे १० हजार रुपये इतकी आहे. जाधव यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.