‘ती’ चुकीची कारवाई मागे घ्या अन्यथा…? महाविकास आघाडीने दिला हा ‘इशारा’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर भारतीय जनता पार्टीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन केलेली कारवाई चुकीची असून, ती कारवाई त्वरीत मागे घेण्यात यावी.

अन्यथा महाविकास आघाडीच्यावतीने तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा शेवगाव तालुका महाविकास आघाडीच्यावतीने निवेदनाव्दारे देण्यात आला.

तहसलीदार वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलिक हे राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री असून ते सातत्याने भाजप व केंद्रीय यंत्रणांच्या कारवाई विरोधात आवाज उठवत आहेत.

मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन आमच्या विरोधात बोलाल तर तुमची ही गत अशी होईल.

असा इशारा या कारवाईतून दिसून येत आहे. मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या विरोधात एकवटले असून अशा स्वरुपाच्या कारवायांना यापुढे जशासतसे उत्तर दिले जाईल.असा देखील इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe