७ मार्च २०२५ पारनेर : पारनेर तालुक्यातल्या एका प्राथमिक शाळेतल्या वयस्कर शिक्षकाने शनिवारी (दि. १) या दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याचा तक्रार विद्यार्थिनींनी पालकांकडे केली.त्याबद्दल वर्तमान पत्रांमध्ये गुरुवारी (दि. ६) हि बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाकडून याची दखल घेतली गेली त्यामुळे त्या शिक्षकाच्या चौकशीसाठी दोन विस्तार अधिकाऱ्यांसह महिला केंद्र प्रमुख व मुख्याध्यापिका, असे चार जणांचे पथक नियुक्त केले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सीमा राणे यांनी दिली.
पारनेर पंचायत समिती शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी चांगदेव गवळी, विस्तार अधिकारी कांतीलाल ढवळे, केंद्रप्रमुख मंदा साबळे, हंगा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा ठोकळ या चारजणांचे पथक गुरुवारी शाळेत येऊन त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.या चौकशी समितीचा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविला जाईल.

पालक तसेच सहायक शिक्षिकांचे कॅमेऱ्यासमोर जबाब
तीन विद्यार्थिनींच्या तीन पालकांचे आणि त्याच शाळेत काम करत असलेले शिक्षिक यांचे कॅमेऱ्यासमोर जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती सुपा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.तसेच त्या शिक्षकाला सुद्धा चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.सध्या तो शिक्षक फरार असून, त्याचा मोबाइलसुद्धा बंद असल्याची माहिती दिवटे यांनी दिली आहे.
त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सीमा राणे यांनी दिली. तो शिक्षक सध्या रजेवर गेला आहे. तसेच मोबाइलही बंद आहे. त्यामुळे या शिक्षकावर पोलिस व शिक्षण विभाग काय कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.