‘त्या’ मायलेकींचा मृत्यू गॅस स्फोटामुळे नाहीतर धनाच्या हव्यासापोटी, नातेवाईकांचा आरोप

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  बेलापूर येथे गेल्या महिन्यात गॅसच्या स्फोटात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र हा गॅसचा स्फोट नसून धनाच्या लालसापोटी भोंदीबाबांना हाताशी धरून काही मंडळींनी केलेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप मयत ज्योती शेलार यांच्या राहुरी येथील माहेरच्या नन्नवरे कुटुंबीयांनी केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना दिलेल्या निवेदनात राहुरी येथील राजेंद्र नन्नवरे यांनी म्हणले की २ जानेवारी अमोवसेच्या रात्री मयत नमोश्री शेलार या चिमुरडीला धनाच्या ठिकाणी दर्शनासाठी किशोर खरात,काजल खरात, शशिकांत शेलार हे भोंदूबाबाच्या समवेत घेऊन गेले

व येताना भोंदूबाबा यांनी मयत ज्योती शेलार यांच्या घरच्यांना काहीतरी चॉकलेटी कापडात वस्तू बांधून दिली सदर बांधलेली वस्तू कपाटात तिजोरीच्या कप्प्यात ठेवून दिली त्यांनंतर शशिकांत शेलार हे दारुच्या नशेत घरी आले बळजबरीने संपत आलेली गॅस टाकी बदलून नवीन गॅस टाकी शेगडीला जोडली दि.६ जानेवारी रोजी सकाळी घरामध्ये मोठा स्फोट घडवून आला.

या घटनेत माझी बहिण ज्योती व भाची नमोश्री शेलार ह्या गंभीर जखमी झाल्या दरम्यान त्यांच्या उपचारासाठी भावनिक आवाहन करून बाळासाहेब अशोक शेलार व पवन बाळासाहेब शेलार यांनी जवळपास ४ लाख रुपये आर्थिक मदत गोळा करून ती स्वतःच्या खिशात घातल्याचा आरोप नन्नवरे कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान या घटनेतील जखमी जयश्री व नमोश्री यांचा मृत्यू झाला मात्र घटनेनंतर सदर ठिकाणी गॅस टाकी त्याला जोडलेला पाईप व शेगडी सुस्थितीत असल्याचे दिसून आले.

शेगडीवरील ठेवलेले भांडे जैसे थे होते या वरून सदर स्फोट हा जाणून बुजून धनाच्या लालसेपोटी भोंदूबाबाच्या नादी लागून सुनियोजित कट असल्याचा आरोप नन्नवरे कुटुंबीयांनी करून

याप्रकरणी शशिकांत शेलार,अशोक शेलार,लिलाबाई शेलार, बाळू शेलार कविता शेलार, पवन शेलार, किशोर खरात, अनिकेत पाटोळे,काजल खरात तसेच गागरे बाबा,सांगळे बाबा,देवकर गुरू यांच्यावर जादूटोणा कायदा अंतर्गत कारवाई व्हावी अन्यथा आम्ही नन्नवरे कुटुंबीय आत्मदहन करू असा इशारा राजेंद्र नन्नवरे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe