त्या व्यक्तीवर बिबट्याने नव्हे तर ‘या’ प्राण्याने केला हल्ला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी येथे बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र हा हल्ला तरसाने केला असल्याचा खुलासा वन विभागाने केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बबन कुराडे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांना उपचारासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जखमा गंभीर असल्याने त्यांना नगर येथे हलवण्यात आले.

दरम्यान प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके व कर्मचारी व कर्जत पोलीस विभागाने तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.

याबाबत बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके म्हणाले, घटनास्थळी जाऊन ठशांची पाहणी करण्यात आली. त्यातून हा हल्ला तरसाने केल्याचे निदर्शनास येत आहे.

तसेच ठशांची छायाचित्रे तज्ञांकडे पाठवण्यात आले आहेत. परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याने देखील हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe