कोठेवाडी प्रकरणातील ‘त्या’ आरोपीच्या मुलांकडे 42 तोळ्याचे घबाड; चौघांना अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  कोठेवाडी प्रकरणात शिक्षा भोगत असताना मयत झालेला आरोपी हबाजी पानमळ्या भोसले याच्या तीन मुलांसह चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

जिल्ह्यातील सात तालुक्यात 17 ठिकाणी जबरी चोर्‍या, घरफोड्या केल्याची कबूली त्यांनी दिली. राम बाजीराव चव्हाण (वय 20 रा. आष्टी जि. बीड), तुषार हबाजी भोसले, प्रविण उर्फ भाज्या हबाजी भोसले,

विनाद हबाजी भोसले, (तिघे रा. पिंपरखेड ता. आष्टी जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तुषार, प्रविण व विनाद ही कोठेवाडीतील आरोपी हबाजी भोसले याची मुले आहेत.

राम चव्हाण याच्यासोबत राहून त्यांनी चोर्‍या, घरफोड्या केल्या आहेत. त्यांच्याकडून 42 तोळे सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व तीन दुचाकी असा सुमारे 23 लाख 52 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आह.

त्यांनी नगर जिल्ह्यात राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव तालुक्यामध्ये 17 ठिकाणी बंद घरात प्रवेश करून जबरी चोरी व घरफोडी केल्याची कबूली दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe