आचासंहिता लागू ! नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी हटवली राजकीय प्लेक्सबाजी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  कर्जत नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया जाहीर होवून आचासंहिता लागू झाली.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी कर्जत शहरातील मेन रोड व इतरत्र असलेले सर्व राजकीय पक्षाचे फलक, झेंडे हटवले आहे.

दरम्यान तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कर्जत नगरपंचायतच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

या प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांवर हरकती घेतल्या जात आहे. हरकती घेण्याचा काल शुक्रवार हा शेवटचा दिवस होता.

आतापर्यंत ज्या हरकती घेतल्या आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येने मतदार याद्यांचा घोळ असल्याचे दिसून आले.

अनेक मतदार एका ठिकाणी राहत असताना त्यांची नावे दुसऱ्या प्रभागात आली आहेत. काही प्रभागांमध्ये नव मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.

दरम्यान तालुक्यात निवडणुका प्रक्रिया जाहीर झाली असून आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावी असे आवाहन प्रांताधिकारी व नगरपंचायतचे प्रशासक अजित थोरबोले व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe