अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचा विकास खुंटला असून तालुक्यातील जिल्हा व राज्यमार्गासाठी निधी देण्यास राज्य शासन हतबल असल्याचा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी अमरापूर येथे केला.
अमरापूर येथे आमदार स्थानिक निधीतून पंधरा लाख रुपये खर्चाच्या हनुमान मंदिर सभामंडप कामाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे, अध्यक्षा आशा गरड, शहराध्यक्षा उषा कंगनकर, अर्बन बँकेचे संचालक कमलेश गांधी, रोहिणी फलके, डॉ. अरविंद पोटफोडे, संदीप वाणी, संतोष चोरडिया,
वाय. डी. कोल्हे, संदीप खरड, सुभाष बरबडे, सोपान वडने, संभाजी फटांगरे, गंगाभाऊ खेडकर, मुसाभाई शेख, बशीर पठाण आदी उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या, रस्त्यांची दुरवस्था झाली असताना आघाडी शासन जिल्हा व राज्यमार्गाला निधी देत नाही. एखादा जीव गेला तरच, हे शासन निधी देणार आहे का?
जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी आपल्या भाषणात नियोजन समितीवर दोन राजकीय पुत्रांची वर्णी लागली. बाकी कुणी लायकीचे नाही का?
असा सवाल करीत आघाडी शासन नात्यागोत्याचे राजकारण करीत ठरावीक घरात सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम