शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  महावितरणकडून होत असलेल्या सक्तीच्या वीज बिल वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त व शेतकऱ्यांनी संतप्त होत देवळाली प्रवरातील महावितरण कार्यालया सोमवार दि 24 जानेवारी कुलुप ठोकून आधिकाऱ्यांना कोडून घेतले आहे.

देवळाली प्रवरा येथील महावीतरणाच्या उपकार्यकारी अभियंता कार्यलयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली त्रिंबकपूर,

टाकळीमिया,जातप व देवळाली प्रवरा येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यलयावर मोर्चा आणून कुलूप ठोकले आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे,

नानासाहेब शेळके, गौतम कोळसे, विलास कोळसे, बाबासाहेब कोळसे, राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर कोळसे, बाबासाहेब खाडे, महेश कोळसे, आदिनाथ कोळसे,

राजेंद्र आढाव, चंद्रकांत आढाव, केशव शेळके, नानासाहेब कोळसे, सचिन कोळसे, सुरेश कोळसे, ज्ञानदेव खाडे, राजेंद्र टिक्कल,संतोष मुसमाडे, गणेश बडाख,दत्तू दुधे आदी सहभागी झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe