अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- आम्ही राजकारण करत असताना कटकारस्थाने याच्या नादी न लागता लोकांची कामे करण्यावर भर देतो . मात्र काहीजण पराभवाच्या नैराश्यातुन अजुन बाहेर पडलेले दिसत नाही.
म्हणुनच आपल्या राजकारणाला अडचण ठरणाऱ्या निष्पाप कार्यकर्त्यांना विनाकारण खोटया पोलिस केसेसमध्ये अडकवण्याचे विषारी राजकारण सुरू झाले आहे .
पण याद राखा आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला तर हा कुटील डाव तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही अशी टिका राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कुणाचे नाव न घेता केली .
नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील एका सोहळ्यात ना. तनपुरे बोलत होते. कालच नगर तालुक्यातील शिवसेना नेते व तनपुरे यांचे समर्थक गोविंद मोकाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.
या पाश्वभुमिवर तनपुरे यांनी सुचक विधान नाव न घेता टिका केली. मात्र त्यांच्या टिकेचा रोख हा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडेच होता अशी चर्चा कार्यक्रम स्थळी सुरू झाली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम