एटीएम लुटण्यासाठी चोरटे शटरच्या आत घुसले अन अडकले… पहा पुढे काय घडले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- काही अज्ञात चोरट्यांनी श्रीगोंदा शहरातील दौंड जामखेड या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही यामुळे मोठी घटना घडण्यापासून बचावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चोरटे एटीएम फोडण्यासाठी आत गेले आणि त्यांनी कुणाला काही समजू नये म्हणून एटीएमचे शटर आतून ओढून घेतले. मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.

पण तो फेल झाला बाहेर निघण्यासाठी चोरट्यांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शटर उघडले नाही त्यामुळे काही काळ चोरटे आतच फसले.

बाहेर येण्याआधी त्यांनी शटर खालून मिरचीपूड बाहेर टाकली आणि बाहेर येण्यासाठी गॅस कटरचा वापर करून शटर एका बाजूने कापून चोरटे बाहेर पडले.

श्रीगोंदा पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी मिरचीपूड, रॉकेल, भुसा पोतं मिळून आलं आहे. एटीएम मशीन एका बाजूने कापण्यात आल्याचे दिसून आले आहे. श्रीगोंदा पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe