अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या आडून मोठे राजकारण करत आहे. प्राथमिक, माध्यमिक, तांत्रिक शिक्षणाबाबत कोणतेच ठोस धोरण नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.
सत्तेतील प्रत्येक व्यक्ती हा स्वत:चाच स्वार्थ पाहू राहिला आहे. हे सरकार म्हणजे अहंकाराचा महामेरु आहे. त्यामुळे येणार्या काळात जनता त्यांना आपली जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

त्याची सुरुवात पोटनिवडणुकीत दिसून येत आहे. असे टीकास्त्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर केले. आमदार आशिष शेलार नगरमध्ये आले असता ते बोलत होते.
ते म्हणाले की, राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याने प्रत्येक मंत्री आपआपल्या पद्धतीने निर्यण घेऊन मोकळे होत आहेत.
या निर्णयाचा जनतेला फायदा होईल की तोटा याचे काही देणे घेणे नाही. फक्त आपले कार्यकर्ते पोसण्याचे काम सुरु आहे.
नगरमध्ये भाजपाचे काम चांगले असून पुढील काळात नगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची सत्ता असेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम