कुरकुरे आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा असा झाला..मृत्यू..

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील कणगर येथील माळवाडी पिंपळदरा येथील ओढ्यावरील नाल्यात पडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी घडली.

बालकाच्या मृत्यूमुळे कणगर गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. कणगर येथिल कणगर शोयब साजिद शेख हा आठ वर्षीय बल्क रविवारी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान माळवाडी पिंपळदरा येथिल किराणा दुकानात कुरकुरे आणण्यासाठी गेला होता.

ओढ्यावरील बंधाऱ्याच्या नाल्यात पडला.हा खड्डा साधारण 10 ते 15 फुट खोल असुन पाण्याने भरलेला आहे. शोयब हा खड्ड्यात पडल्यावर तळाच्या गाळात रुतुन बसल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही.

सायंकाळी उशिरा शोयब घरात नसल्याचे लक्षात आल्यावर शोधा शोध सुरु झाली.कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे यांनी ग्रामसुरक्षा यंञणेवरुन सोशल मिडीयाद्वारे संदेश पाठवून गावातील नागरीकांना माहिती दिली.

सरपंच घाडगे,उपसरपंच बाबासाहेब गाडे,पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे,जयसिंग घाडगे,शिवाजी जाधव आदींनी परीसरात राञभर शोध घेतला.

परंतू शोयब सापडला नाही. सोमवारी सकाळी ओढ्यावरील नाल्याच्या खड्ड्यात शोएबचा मृतदेह तरंगत असताना स्थानिक व्यक्तीने पाहिला.त्याने पोलिस पाटील मुसमाडे यांना या घटनेची माहिती दिली.

पोलिस पाटील यांनी राहुरी पोलिस ठाण्यास कळवून घटनास्थळी गेले असता शोयबचा मृतदेह असल्याची खाञी केली.अनिल बर्डे,सिराज इनामदार,नदीम शेख आदींनी मृतदेह बाहेर काढला.जागेवर पंचनामा करुन साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहीनीतून रविंद्र देवगिरे यांनी शवविच्छेदनासाठी नेले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe