विजेचा जोराचा धक्का बसून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- एका तरूण शेतकऱ्याला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे घडली आहे.

नाजीम पापा देशमुख (३२ वर्षे) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नाजीम देशमुख हे बारागाव नांदूर गावातील अल्पभुधारक शेतकरी होते.

त्यांच्या पत्नी, आई व मुले हे लग्नासाठी परगावी गेले होते. त्यामुळे घरात एकटेच असतानाच शनिवारी दि. २० रोजी सकाळी त्यांना शॉक बसला.

सायंकाळी कुटुंबिय घरामध्ये आले असता त्यांनी नाजीम देशमुख यांना मृतावस्थेत पाहिले. घरामध्ये असलेल्या विजेच्या थिणग्यांनी त्यांचे शरीर काहीशा प्रमाणात भाजल्याचे निदर्शनास आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, प्रभाकर गाडे, बार्टीचे इजाज पिरजादे, इम्रान देशमुख, जिल्लूभाई पिरजादे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रविवारी रात्री अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. रविवारी सकाळी शवविच्छेदन होऊन दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तहसीलदार फसियोद्दीन शेख, कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, महावितरण अधिकारी धीरज गायकवाड यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. देशमुख यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन बंधू असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe