अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- आपल्याला भावकीचे वाद सर्वसृत आहेत. अनेकदा विकोपाला जाऊन छोट्या गोष्टीचे रूपांतर मोठ्या वादात होते. अशीच घटना जामखेड तालुक्यातील साकतमध्ये घडली आहे.(scuffle)
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील साकत येथे काल रात्री साडेदहा च्या सुमारास झालेल्या मारामारीत एका गटाने दोघांना बेदम मारहाण केली.

या घटनेत आरोपींनी तलवार, कुऱ्हाड, कोयता व काठीने फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व पुन्हा जर नादी लागले तर कायमस्वरूपी अवस्था करू अशी धमकी दिली.
अशी फिर्याद पांडुरंग नागनाथ अडसुळ याने दिली. त्यावरून जग्न्नाथ उर्फ दादा पोपट अडसुळ, ज्ञानेश्वर पोपट अडसुळ, भाऊसाहेब चत्रभुज मुरुमकर,
पप्पू अश्रू अडसुळ, बाळू हनुमंत अडसुळ, हनुमंत विष्णू अडसुळ, पोपट बापुराव अडसुळ या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













