अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- राहुरी कृषी विद्यापीठातील बियाणे विभागाच्या प्रक्षेत्रावरील पाच हजार रुपये किमतीचा दोन टन ऊस चोरून नेल्याची घटना घडली आहे.(Rahuri Agricultural University)
या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडुन देण्यात आलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी कृषी विद्यापीठ बियाणे तंत्रज्ञान योजना विभाग प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले १९ डिसेंबर रात्री दहा ते २० डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान
बियाणे विभाग विद्यापीठ यांच्या प्रक्षेत्रातून पाच हजार रूपये किंमतीचा दोन टन ऊस चोरी गेला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष राठोड करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम