अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. एक ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर पलटी होऊन अंगावर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.(Ahmednagar Crime)
सादर दुर्घटना कर्जत तालुक्यातील खेडनजीकच्या पुलालगत घडली आहे. शिला आजिनाथ चव्हाण, रा. खेड असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली होती.
याबाबत अधिक माहितीअशी कि, भीमा नदीच्या पुलालगत हा अपघात झाला आहे. पुलानजीक मासे विक्री करणारी दुकाने आहेत. रस्त्यालगत मासे विक्री करणाऱ्या महिलेच्या अंगावर ट्रेलर कोसळला.
काही वेळानंतर ट्रेलर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर महिलेला भिगवण येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम