बायकोने नवऱ्याला बॅटने धोपटले, पोलिसांत गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  पतीने पत्नीला मारहाण केल्याच्या अनेक घटना समाजात घडत असतात. मात्र पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीला लाकडी बॅटने व लाथा बूक्क्यांनी धोपटून काढल्याची घटना नूकतीच राहुरी तालुक्यात घडली आहे.

पतीने थेट पोलिस ठाणे गाठून आपल्याच पत्नी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. नंदू लक्ष्मण आघाव वय ४७ वर्षे, राहणार रेल्वे स्टेशन, राहुरी.

यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक २ डिसेंबर रोजी सव्वासात वाजेच्या सुमारास त्याची पत्नी आरोपी निता नंदू आघाव ही मोबाईलवर कोणा बरोबर बोलत होती.

नंदू आघाव यांनी तिला विचारले कि, कोणा बरोबर बोलत आहेस. तेव्हा ती म्हणाली कि, मी फोनवर बोलत नव्हते. या गोष्टीचा तिला राग आला. तेव्हा तीने घरातील लाकडी बॅटने नंदू आघाव यांच्या डोक्याला मारहाण केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

नंदू लक्ष्मण आघाव यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आणि पोलिसां समोर घडलेला प्रकार कथन केला. घडलेला प्रकार ऐकून पोलिस देखील आश्चर्य चकित झाले होते.

नंदू आघाव यांच्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी निता नंदू आघाव हिच्या विरोधात मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पोपट कटारे हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News