फिरायला गेलेल्या महिलेचे सोन्याचे गंठण ‘धूम स्टाईल’ लांबवले !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सध्याच्या काळात प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव अनेकजण सकाळी व संध्याकाळी देखील फिरायला जातात. मात्र हीच संधी साधून अनेक भामटे महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवत आहेत.

अशीच फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातून मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी चौदा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लांबवल्याची घटना पाथर्डी शहरात घडली आहे.

रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना मात्र त्याचा तपास लागत नाही. अवैध मार्गाने पैसे कमवायचे, या पैशाच्या जिवावर पुन्हा गुंडगिरी करायची असाच प्रकार सुरू आहे.

पाथर्डी-धामणगाव रस्ता, पाथर्डी-ते नगर रस्ता, पाथर्डी-शेवगावर स्ता, पाथर्डी-मोहटादेवी रस्ता या रस्त्यांवर सकाळी व सायंकाळी महिला व पुरुष फिरायला जात असतात.

आशा ललित गुगळे ह्या पाथर्डी ते धामणगाव रस्त्याला फिरायला चालल्या होत्या. रस्त्याने चालत असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या एका अज्ञात युवकाने गुगळे यांच्या गळ्यातील सोन्याच्या मिनी गंठणला झटका देऊन घेऊन पळाला. गुगळे यांनी आरओरड केली.

मात्र, तोपर्यंत तो मोटारसायकवरून पसार झाला. पोलिसांनी गुगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe