चुकीच्या पद्धतीने रद्द केलेल्या निविदा प्रकरणी झेडपीसमोर उपोषण करणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव व ठाकूर निमगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामाच्या निविदा चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आल्या आहेत.

यामुळे ग्रामस्थांसह झेडपी सदस्य हर्षदा काकडे यांनी मंगळवार (दि.23) रोजी जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव व ठाकूर निमगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामाच्या निविदा चुकीच्या पद्धतीने रद्द केल्याचा आरोप सदस्या काकडे यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेत काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी निविदा प्रक्रिया झालेली कामे रद्द करण्याचा प्रयत्न करत असून ही बाब चुकीची असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिले.

तातडीने आधीच्या निविदेनुसार या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे करावीत, अन्यथा मंगळवार दि.23 रोजी जिल्हा परिषद उपोषण करत चुकीचे कामे करणार्‍या विरोधात घंटानाद करण्यात येणार असल्याचा इशारा काकडे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe