AhmednagarLive24 ;नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर सावरगाव येथील काळेवाडी शिवारात भरधाव इर्टिका कारने मोटारसायकला धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती बाळासाहेब बांडे यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. मिनीनाथ बाबासाहेब बांडे (वय 33, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.

सावरगाव (ता. पारनेर) येथे सोमवारी (दि. 23) दुपारी अडीच वाजता इर्टिका कार (एम. एच.04 एच.एम. 1300) नगरहून कल्याणकडे भरधाव वेगाने जात असताना राष्ट्रीय महामार्गावर काळेवाडी (सावरगाव) नजीक मोटारसायकलला (एम.एच. 16 ए.एस.6865) जोराची धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलस्वार मिनीनाथ बांडे याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत इर्टिकाचालक अजित भडक वाव्हळ (रा. शहाड, ता. कल्याण, जि. ठाणे) याला ताब्यात घेतले आहे.