Ahmednagar News : अहमदनगर बनणार महामार्गाचे ‘हब’ ! ८६९ किलोमिटरचे राष्ट्रीय महामार्ग बनणार, पुण्याला ७५ मिनिटात तर महत्वाच्या राज्यांतही अवघ्या काही तासात पोहोचता येणार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व जिल्ह्यातून आता विविध राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरु आहे. आणखी काही मार्ग लवकरच सुरु होतील तर काही पूर्ण होतील. सध्या मिळालेल्या माहितीनुसार शहरात तसेच जिल्ह्यात साधारण ८६९ किलोमिटरचे राष्ट्रीय महामार्ग बनणार आहेत.

नगर जिल्ह्यात १० हजार ३२१ कोटींच्या विविध महामार्गाच्या प्रकल्पातून कामे सुरु असून आगामी दहा वर्षात अहमदनगर हे महामार्गाचे ‘हब’ बनेल हे मात्र निश्चित. त्यामुळे दक्षिण भारतासह अन्य राज्यातून ये-जा करणारी वाहतूक ही नगरमार्गे असणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील मिटेल यात शंका नाही.

शहरातून जाणारा छत्रपती संभाजीनगर- आहमदनगर-पुणे हा महामार्ग वगळता जाणारे अन्य बहुतांश मार्ग हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेले आहेत. त्यामुळे पूर्वी असलेले दुहेरी मार्ग आता चार पदरी होत आहेत.

शहरातून जाणारा आमदनगर- मनमाड, अहमदनगर करमाळा-टेंभुर्णी, कल्याण-नांदेड अहमदनगर, अहमदनगर-कडा आष्टी-जामखेड, अहमदनगर – दौड हे महामार्ग रष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेले आहेत. यातील बहुतांशी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. नगर शहराबाहेर असलेल्या ग्रामीण भागात देखील महामार्गाचे जाळे विस्तारले आहे.

अहमदनगर शहर व जिल्ह्यात २०१४ नंतर नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गांची तांची ८६९ किलोमीटर आहे. एकूण राष्ट्रीय महामार्गाचर दुहेरी महामार्गाची लांबी १०७१ किलोमोटर आहे. प्रामुख्याने नगर शहराजवळील वाह्यवळण रस्त्याची लांची ४० किलोमीटर आहे. यावर ७०० कोटींचा खर्च आला आहे.

अहमदनगर करमाळा टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाची लांबी (प्रकल्प एक) ३८ किलोमीटरची असून, हा प्रकल्प ९८० कोटीचा आहे, तर दुसरा प्रकल्प ४१ किलोमीटरचा असून हा १ हजार १३१ कोटी ९० लाखांचा आहे. या तिन्ही प्रकल्पाची लांची एकूण १२० किलोमीटरची असून, २ हजार ९७४ कोटींचा खर्च होणार आहे.

तळेगाव-शिक्रापूर- नाव्हरा- श्रीगोंद- जामखेड- पाटोदा हा रस्ता सार्वजनिक बांधकामकडे प्रस्तावित आहे. कल्याण-नांदेड- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग ४९ किलोमीटरचा असून २२० कोटी या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. याच महामार्गावरील खरवंडी कासार दुहेरी मार्ग ५१ किलोमीटरचा असून २६० कोटींचा खर्च या प्रकल्पावर होणार आहे. इनामगाव -काष्टी- श्रीगोंदे जामखेड राष्ट्रीय महामार्ग ४८ किलोमीटरचा असून ३११ कोटींचा खर्च होईल.

नगर – पुणे ७५ मिनिटांत शक्य

नगर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीत २०१४ नंतर तब्बल ४५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, प्रामुख्याने ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेले बहुतांश रस्ते हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेले आहेत. या महामार्गांचे कामे देखील पूर्ण झाले आहे.

सध्या रेंगाळलेला छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर -पुणे या एक्सप्रेस वे चे काम पूर्ण होताच छत्रपती संभाजीनगर येथील प्रवाशांना अडीच तासांत तर अहमदनगर शहरातील प्रवाशांना अवघ्या ७५ मिनिटांत पुण्याला जाणे शक्य होईल असे सांगितले जात आहे.

सूरत-अहमदनगर ग्रीन फिल्डदेखील जिल्ह्यातूनच

अहमदनगर -कड़ा-आष्टी- जामखेड राष्ट्रीय महामार्ग ५१ किलोमीटरचा असून २५ कोटींचा खर्च यावर होणार आहे. झगडे फाटा-कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग हा ७ किलोमीटरच्या असून, त्यावर ७ कोटीचा खर्च अपेक्षित आहे.

तर कोपरगाव – वैजापूर राष्ट्रीय महामार्ग पुणतांबा फाटा ते नगर १७ किलोमीटरचा असून यावर देखील १९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नव्याने होत असलेला सुरत- नाशिक – अहमदनगर ग्रीन फिल्डची नगर जिल्ह्यातील लांबी १०० किलोमीटरची असून, यावर ६ हजार ८४३ कोटी खर्च होणार आहे.

 उद्योग, व्यवसाय वृद्धिंगत होतील

नगर शहरात ३०० कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल तयार आहे. नगरजवळील ४० किमी अंतराच्या बाह्यवळण रस्त्यामुळे नगरच्या विकासाला चालना मिळाली. नगर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारित होणार असल्याने महत्वाच्या शहरांशी, राज्यांशी कनेक्टिव्हीटी वाढेल व उद्योग, व्यवसाय वृद्धिंगत होतील. यातून सर्वांचाच विकास सध्या होईल यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe