कर्मवीर शंकरराव काळे यांच्या शिकवणीनुसार कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील असा भेदभाव न करता २०२३-२४ ला गळितास आलेल्या ऊसाला अंतिम पेमेंट १२५ रुपये प्रति मे.टनप्रमाणे देऊन दिवाळीपूर्वीच ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात हे पेमेंट जमा करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांनाही २० टक्के बोनस देण्याचे आ. आशुतोष काळे यांनी जाहीर केले असून साखर कामगारांच्या वेतन वाढीसंदर्भात त्रिपक्षीय समितीचा जो निर्णय येईल, त्याची तात्काळ अंमलबजावणी करू, अशी ग्वाही दिली.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण व त्यांच्या पत्नी शंकुतला चव्हाण यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आला. शेतकऱ्यांनी चालू लागवड हंगामात जास्तीत जास्त पूर्व हंगामी व सुरु ऊस लागवडी कराव्यात.चालू हंगामात तुटणाऱ्या ऊसाचे खोडवे ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवण, पद्माकांत कुदळे, ज्ञानदेव मांजरे, एम. टी. रोहमारे, काकासाहेब जावळे, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, बाबुराव कोल्हे, कृष्णराव गाडे, सोमनाथ घुमरे, संभाजीराव काळे, भास्करराव चांदगुडे, कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिद्र बडें, सचिन चांदगुडे, राहुल रोहमारे, अनिल कदम, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, दिनार कुदळे, अशोक मवाळ, सुनील मांजरे,मनोज जगझाप,प्रवीण शिंदे,गंगाधर औताडे,श्रावण आसणे,इंदुबाई शिंदे,वत्सलाबाई जाधव
माजी उपसभापती अर्जुनराव काळे, गौतम कुक्कुटपालनचे चेअरमन विजयराव कुलकर्णी, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन बापूराव जावळे, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष गवळी, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, तसेच सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले तर संचालक सचिन चांदगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळी १२ वाजता उठायचे आणि ऑफिस मध्ये बसून प्रेसनोट काढणाऱ्यांना कसा विकास दिसणार. जे निवडणुका आल्या की मगच घराबाहेर पडतात. रोजगार मेळावे घेऊन वेळ मारून नेतात; परंतु जनता आता सुज्ञ झाली असून जनता त्यांच्या गप्पांना आता भुलणार नाही.
आपण विकासाबरोबरच शासनाच्या सर्व योजना सर्वसमान्य जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत. त्यामुळे जनता समाधानी आहे. तुम्ही मात्र बेसावध राहू नका. आपण गळित हंगामही यशस्वी करू आणि विधानसभेतही यश मिळवू. आ. आशुतोष काळे