Ahmednagar Politics : अजित दादाच नागवडेंचे गॉडफादर ! काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, आमदारकीसाठी दंड थोपटले, आ. बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवशीच मोठ्या घडामोडी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात आगामी निवडणुकीच्या अनुशंघाने वेगवेगळे ट्विस्ट येऊ लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील काही बडे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन भेटले.

ही घटना ताजी असतानाच आता श्रीगोंद्यातील नेते राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मागील अनेक दिवसांपासून ते राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होतीच. दरम्यान त्यांनी आता काही झाले तरी विधानसभा लढवणारच असे सांगत दंड थोपटले आहेत.

विशेष म्हणजे या सर्व घडामोडी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवशीच झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना देखील हा एक धक्का असेल असे म्हटले जात आहे.

विधानसभेसाठी थोपटले दंड, मातब्बरांचे टेन्शन वाढवले

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून अनुराधा नागवडे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळो अथवा ना मिळो निवडणूक लढवणारच अशी माहिती देत तसा निर्धार नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केलाय. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी महायुती सरकारच पाठबळ मिळणार असल्याचं देखील म्हटले आहे.

ते म्हणाले की, राजकारणात गॉडफादर हवा असतो व त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून आगामी काळात ते पाठबळ देतील असे म्हटले आहे.

या राजकीय प्रक्रियेत बाळासाहेब नाहटा यांनी महत्वाची भूमिका पार पाडली असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी सध्याचे आ. बबनराव पाचपुते यांचे टेन्शन वाढले आहे.

बैठक घेत निर्णय

पुढील राजकीय वाटचाल, दिशा ठरवण्यासाठी नागवडे यांनी समर्थकांची बैठक श्रीगोंदा येथे घेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याबाबत सर्व कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा अनुराधा नागवडे,

राजेंद्र नागवडे यांनी पक्ष श्रेष्ठींकडे पाठवला. यावेळी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा, बाबासाहेब भोस, राकेश पाचपुते आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून अजितदादांच्या संपर्कात

मार्च‎ २०२३ मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या पदावर राजेंद्र नागवडे विराजमान झाले होते. अनुराधा नागवडे‎ यांच्याकडे महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती.

परंतु मागील काही दिवसांपासून ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संपर्कात होते. अनेक वेळा भेटी देखील झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या व आमदारकीच्या चर्चा सुरु झालेल्या होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe