अरेरे!कांद्यापाठोपाठ ‘या’ पिकाचेही दर कोसळले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-कोरोनामुळे आज बाजारात प्रत्येक वस्तूचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे जीवनाची लढाई लढताना आज प्रत्येकजणाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. यात शेतकरी तर सर्व बाजूने पुरता वेढलेला आहे.

त्यात परत शेतमालाचे कोसळलेले त्याच्या जीवाला घोर लावत आहेत. सध्या कांदा व त्यापाठोपाठ आता टोमॅटोचे दर प्रचंड कोसळले आहे. ते थेट दोन रुपये किलो झाल्याने शेतकरी आता पुरता हाताश झाला आहे.

आजवर त्याने निसर्गाशी दोन हात करत प्रचंड मेहनत करून महागडी खते, बियाणे खरेदी केली. पीक देखील जोमात आले मात्र आज त्याच्या पिकाला अवघा दोन रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे.

त्यामुळे शेतकरी परत एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. अहमदनगर येथील बाजार समितीत आज मिळालेले दर: टोमॅटो २ ते ४ रुपये प्रति किलो, बटाटे १२ते१५, वांगी ५ ते १०, कांदे ५००ते३०००, मेथी, कोथिंबीर ५रुपये प्रति जुडी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment