सर्व सहकारी संस्था यांनीच बंद पाडल्या..? प्रताप शेळके यांची कर्डिले यांच्यावर टीका

Updated on -

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- येथील मार्केट कमिटीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी मार्केटचा लिपीकच सर्व कारभार पाहत आहे. प्रशासक फक्त नावालच आहे .

सहकारी संस्था तोट्यात घालून बंद करायच्या हे विरोधकांच्या डोक्यात आहे. सर्व संस्था यांच्यामुळे बंद झाल्या आहेत. असा टोला जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी माजी आ.शिवाजी कर्डीले यांचे नाव घेता लावला .

नगर तालुक्यातील टाकळी काझी , डोंगरगण येथील सोसायटीच्या निवडणुकीत निवडुण आलेल्या संचालकाच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शेळके म्हणाले नगर तालुक्यातील निवडून आलेल्या संचालकांनी संस्था टिकवली तरच नगर तालुक्यातील मार्केट कमिटीचे अस्तित्व राहणार आहे.

मार्केट कमिटी विरोधकांच्या ताब्यात गेली तर पुढची पाच वर्षात पुन्हा मार्केट कमिटीची निवडणुक होणार आहे . या कमिटीमधील जागावर विरोधकांचा डोळा आहे .

जागा विकायच्या हाच यांचा धंदा आहे . यावेळी गाडे म्हणाले नगर तालुक्यातील ग्रामपंचायत सोसायटीच्या निवडणुकीत आत्ता पर्यत कधीच लक्ष घातले नाही .

मात्र आता शेतकऱ्याची मार्केट कमिटी वाचली पाहिजे यासाठी सोसायटी निवडणुकीत लक्ष घालत आहे . आता पर्यत झालेल्या सोसायटी निवडणुकात जवळपास सर्वच महाआघाडीच्या ताब्यात आल्या आहे .

मात्र विरोधकांना सगळ माझच म्हणण्याची सवय लागली आहे . तालुक्यातील दुध संघ , कारखाना यांच्या मुळे बंद झाला. खरेदी विक्री संघ नावालाच उरला . आता फक्त मार्केट कमिटी राहिली या मार्केट कमिटीमधील जागेवर यांचा डोळा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!