अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- आघाडी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नसून सरकार व त्यांचे मंत्री सध्या वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. आज विविध समस्यांमुळे शेतकरी
खूप मोठ्या संकटात सापडलेला असून, त्याला आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांचीच वीज बंद केली जाते, लोकाभिमुख शासकीय योजना बंद केल्या.

हे सरकार फक्त स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहे. अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. जिल्हा नियोजन अंतर्गत एका कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी त्या म्हणाल्या, माजी आमदार राजीव राजळे हे हयात असताना त्यांनी या वस्ती रस्त्याची मागणी केली होती. या वेळी त्यांनी तसा शब्दही दिला, ते आज आपल्यात नाहीत याचे दुख: सर्वांनाच आहे.
परंतू दुसरीकडे त्यांनी दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान होत. या आघाडी सरकारला शेतकऱ्यांचे देणेघेणे नसून सरकार व त्यांचे मंत्री सध्या वेगळ्याच कामात व्यस्त आहेत.
शेतकऱ्याची वीज बंद केली जाते, लोकाभिमुख शासकीय योजना बंद केल्या. सरकार हे फक्त स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहे. तरीपण मतदारसंघाच्या विकासासाठी आपला अविरतपणे प्रयत्न असेल, असेही त्या म्हणाल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम