तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही? भाजपच्या ‘या’खासदाराचे थेट आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-   आज मी हिशोब मागायला आलो आहे. तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही. जरंडेश्वरचा मालक कोण, गुरू कमोडीटीचा गुरू कोण असा प्रश्न उपस्थित करत

ठाकरेचा अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही असे थेट आव्हान देत भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत, पवार कुटुंबियांवर जोरादार टीका केली.(Ahmednagar Politics) 

कर्जत येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की,अंबालिकाचा हिशोब सुरू झाला असून तो किती दिवस राहतो हे पाहू कारण आता तो पुन्हा शेतकऱ्यांचा होणार आहे

२७ हजार शेतकऱ्यांचा कारखाना अजित पवार व त्याच्या पत्नीने चोरला, पवार परीवाराने मोठी लूट केली आहे. त्यांनी आईच्या नावाने अवैध पैसे पाठवले पण त्याची चौकशी करू नये कारण त्या आईला यातील काही माहीती नाही.

मंत्री अनिल परब यांचा बेनामी रिसॉर्ट आहे त्याचा हिशोब द्या. हसन मुश्रीफ यांना पण जेल होणार, या सर्वात हुशार माणूस संजय राऊत त्यांनी इडीच्या अधिकाऱ्यांकडे ५० लाख रुपयांचा चेक परत केला, मिलींद नार्वेकर यांनी स्वतः चाच बंगला तोडला.