Ahmednagar News : आरोपी ओम फुगारे हा विळी घेऊन आजीला मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या वडिलांनी अडवले, तेव्हा त्याने वडिलांना लाथा- बुक्क्यांनी व विळी मारून जखमी केल्याची घटना दि. १८ जून २०२४ रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी खूर्द येथे घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की सचिन बाळासाहेब फुगारे (वय ४० वर्षे) हे राहुरी खूर्द येथे त्यांच्या कुटुंबासह राहतात. दि. १८ जून २०२४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सचिन फुगारे, त्यांची आई व मुलगी हे त्यांच्या घरात होते. त्यावेळी सचिन फुगारे यांचा मुलगा ओम सचिन फुगारे हा घरी आला.

त्यावेळी त्याने बहीण व आजीला शिवीगाळ करून आजीला कांदा कापण्याची विळी घेऊन मारायला लागला. तेव्हा सचिन फुगारे यांनी त्याला आडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने वडील सचिन फुगारे यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून विळी मारून जखमी केले. त्यानंतर त्याने घरातील भांडे खाली पाडून भांडयाचे नुकसान केले.
घटनेनंतर सचिन बाळासाहेब फुगारे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा आरोपी ओम सचिन फुगारे (रा. राहुरी खूर्द, ता. राहुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यामधून देखील एक खुनाची घटना समोर आली आहे.
वापरण्यास दिलेला होम थिएटर परत मागितल्याचा राग आल्याने कटरने वार करून तरुणाचा खून केल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये घडलाय. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी परिसरात हा थरार घडला आहे.