अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ताठ ज्येष्ठ नेते शरद पवार हे नुकतेच नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आले होते . यावेळी त्यांचे शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जल्लोषात स्वागत केले.
यावेळी आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नॉलेज हब सुरू करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी पवारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गोंदकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्या श्री साईबाबांचे आपण नि:स्सीम भक्त आहे. शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय नॉलेज हब सेंटर सुरू करण्याबाबत सुतोवाच केले होते.
तसेच त्यासाठी साईसंस्थान व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी राजकीय नेत्यांशी तसेच तज्ज्ञांशी चर्चा करून शिर्डीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॉलेज हब सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नेमणूक केली असून
साई संस्थानच्या माध्यमातून शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॉलेज हब सुरू करणेबाबत आपण व्यक्तिशः या प्रश्नाला चालना द्यावी आणि याबाबत सूचना करण्यात यावी अशी मागणी दीपक गोंदकर यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम