Ahmednagar News : मंगळवारी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. देहरे येथून तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा हा मृतदेह असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच जे समोर आले ते हादरवणारे होते.
आपल्या प्रियकराशी बोलत असल्याच्या रागातून आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे खून करण्यापूर्वी तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे समजते. यात दोन आरोपींचा समावेश करण्यात आला आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव (रा. देहरे) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी : मंगळवारी दुपारी देहरे येथील एका विहिरीत मृतदेह आढळून आल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याबाबत माहिती मुलीच्या नातेवाईकांना कळवण्यात आली. गोट्या उर्फ ऋत्वीक संजय जाधव याचे आरोपी अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे माहिती समोर आली.
तसेच तो मृत मुलीशीही बोलत होता ही बाब आरोपी अल्पवयीन मुलीच्या लक्षात येताच ही गोष्ट तिला आवडली नाही. यातूनच त्या अल्पवयीन मुलीने मृत मुलीस मारहाण करत देहरे शिवारातील जाधव वस्तीकडे नेले. तेथे गेल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने गोट्या उर्फ ऋत्वीक याच्या मदतीने तिला हत्याराने मारून विहिरीत ढकलले.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार खून, अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवले आहे. गोट्या उर्फ ऋत्वीक जाधव याला अटक केली असून २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.