अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-जामखेड पोलीस ठाण्यात एका सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसातील हा दुसरा सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान कर्जत पाठोपाठ सावकारकीचे वाण आता जामखेडात देखील पसरू लागले आहे. याप्रकरणी दीपक अशोक चव्हाण (रा. धर्मयोद्धा चौक, तपनेश्वर रस्ता, जामखेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून गणेश अभिमान भानवसे (वय ३४, रा. रसाळनगर, नगर रस्ता, जामखेड) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि , दीपक अशोक चव्हाण याने १ लाख ३० हजार रूपये शहरातील रसाळनगर येथे राहणारे गणेश अभिमान भानवसे यांना दर महिना ४० टक्के व्याजाने दिले.
फिर्यादीकडून बँकेचे चार धनादेश हमीपोटी घेतले. तसेच दिलेल्या पैशांच्या व्याजाच्या हप्त्याचे पैसे रोख, ऑनलाईन अशाप्रकारे घेतले.
तरीही चव्हाण याने भानवसे यांना धमकी देऊन बळजबरीने दुकानात नेत व्याजापोटीच्या ४६ हजार ९९० रूपयांमध्ये ५५ इंची एलसीडी टीव्ही घेतला.
याबाबत कोणाला सांगितलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी दमदाटीही केली. असे भानवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम