अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण सापडला आहे. पाथर्डी तालुक्यातील एका महिलेला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले.
मात्र, संबंधीत रुग्ण महिलेचा ओमिक्रॉनचा अहवाल येण्यापूर्वी तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. सध्या स्थितीला संबंधित महिलेची प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला आज (रविवारी) डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

दरम्यान याबाबतची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली. कोरोना पाठोपाठ जिल्ह्यावर ओमिक्रोनचे संकट घोंगावत आहे.
दरम्यान यापूर्वी जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण श्रीरामपूरमधे आढळला त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील एका गावात येथे देखील एका महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती शनिवारी समोर आली.
करोना संसर्ग सुरू झाल्यामुळे मुंबई येथे राहत असलेले एक कुटुंब दोन वर्षापासून त्यांच्या पाथर्डी तालुक्यातील मूळगावी येवून राहत आहे.
कुटुंबातील तीन व्यक्तींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्यामध्ये संबंधित महिलेचा पुणे येथून आलेल्या रिपोर्टमध्ये ती ओमिक्रॉन बाधित असल्याचे समोर आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम