शेतमाल नोंदणीसाठी शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- शेतमाल नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी पीक पेराचा उल्लेख असलेला सात बारा उतारा, आधारकार्डाची छायांकित प्रत, बँक पास बुकची छायाप्रत सादर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

बँक पास बुकची छायांकित प्रत सादर करताना रद्द केलेला धनादेश अथवा बँक खात्याबाबत पूर्ण माहिती असलेले बँक स्टेटमेंट सादर करावे. सदरहू बँक खाते बंद अथवा जनधन योजनेतील नसावे याची दक्षता संबधितांनी घ्यावी.

हमीभाव दर तसेच शेतकरी नोंदणी व खरेदी कालावधी पुढीलप्रमाणे आहे. मुग रु. 7196/- प्रति क्विंटल शेतकरी नोंदणी कालावधी 15 सप्‍टेंबर 2020 पासुन आणि खरेदी कालावधी 1 ऑक्‍टोबर 2020 पासुन राहील.

उडीद रु. 6000/- प्रति क्विंटल शेतकरी नोंदणी कालावधी 15 सप्‍टेंबर 2020 पासुन आणि खरेदी कालावधी 1 ऑक्‍टोबर 2020 पासुन राहील.

सोयाबीन रु. 3880/- प्रति क्विंटल शेतकरी नोंदणी कालावधी 01 ऑक्‍टोबर 2020 पासुन आणि खरेदी कालावधी 15 ऑक्‍टोबर 2020 पासुन राहील. जिल्हयातील नोंदणी/खरेदी केंद्र व केंद्रावरील भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहे.

राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, राहुरी (भ्रमणध्वनी क्रमांक 9665722815). संगमनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, संगमनेर (भ्रमणध्वनी क्रमांक 9850319568).

कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर (भ्रमणध्वनी क्रमांक 9421555492).श्रीगोंदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, श्रीगोंदा (भ्रमणध्वनी क्रमांक 9011957878). कर्जतकर फार्मर प्रोडुयसर कंपनी,

कर्जत (भ्रमण ध्वनी क्रमांक 9503031010). कर्जतकर फार्मर प्रोडुयसर कंपनी, कर्जत (भ्रमण ध्वनी क्रमांक9423465151). यशवंत मल्टी पर्पज को ऑप सोसायटी, जामखेड (भ्रमण ध्वनी क्रमांक 7218412412)

शिवरत्न मल्टी पर्पज को ऑप सोसायटी, खर्डा ता.जामखेड (भ्रमण ध्वनी क्रमांक 9422200001). जयभगवान मल्टी पर्पज को ऑप सोसायटी, पाथर्डी (भ्रमणध्वनी क्रमांक 8329404135).

शेवगांव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, शेवगांव (भ्रमणध्वनी क्रमांक 9011541646). कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर (भ्रमण ध्वनी क्रमांक 9021202301)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment