अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेचे अर्ज…

Published on -

Ahmednagar News:प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेंतर्गंत जिल्हयातील शेतकऱ्यांना ३एचपी, ५एचपी व ७.५एचपी क्षमतचे सौर पंप अनुदानावर देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९० टक्के व अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध होतील.

सदर योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. शेततळे, विहीर, नदीनाले तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोतांच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करुन देण्यात येतील.

२.५ एकर शेतजमीन धारकास ३ एचपी, ५ एकरपर्यंत शेतजमीन धारकास ५ एचपी व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जा https://www.mahaurja.com/meda/ संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने अर्ज करावा. असे आवाहन श्री.उगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe