अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी त्यांनी गुरुवारी डॉक्टर दिपाली काळे यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
दरम्यान दीपाली काळे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे स्वाती भोर यांनी यापूर्वी जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.
आंबेजोगाई येथे देखील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द चांगली राहिली आहे. दरम्यान गुरुवारी स्वाती भोर यांनी दिपाली काळे यांच्याकडून श्रीरामपूर विभागाच्या (उत्तर नगर जिल्हा) अपर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला असून
वरिष्ठ मंत्र्यांचा उत्तर नगर भाग येतो. शिर्डीचे महत्व मोठे आहे. त्याच बरोबर अवैध वाळू उपसा, गावठी कट्टे आणि श्रीरामपूर, संगमनेर सारखी संवेदनशील शहरे ही परस्थिती पाहता स्वाती भोर यांना मोठी आव्हाने पार पाडावी लागणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम