अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- नगर तालुका पंचायत समितीच्या कृषी विभाग अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांसाठी 57 लाभार्थांची निवड झाली आहे. यात 17 नवीन विहिरी मंजूर झाल्या आहे.
याबाबतची माहिती सभापती सुरेखा गुंड यांनी दिली. कौडगाव (ता. नगर) येथे मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाचा शुंभारभ शिवसेना दाक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शाशीकांत गाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

दरम्यान पंचायत सामितीच्या कृषी विभागा अंतर्गत 17 नवीन विहीर लाभार्थी, जुनी विहीर दुरुस्ती (8 लाभार्थी), वीज जोडणी (3 लाभार्थी) पंप संच (14 लाभार्थी), ठिबक संच (5 लाभार्थी),
तुषार संच (7 लाभार्थी) याप्रमाणे 57 लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळी जिल्हा परीषद सदस्य शरद झोडगे, संदीप गुंड, कृषी अधिकारी, बाळासाहेब बिबे, सोमनाथ कांडके,
लक्ष्मण महाराज खर्से, गणेश वायसे, संतोष कांडेकर, सोमनाथ थोरात, पोपट कांडके, हरिभाऊ पालवे, गणेश कांडके, देविदास धीवर, राम परभणे, भाऊ पेरणे, अशोक धिवर आदी मान्यवर उपस्थित होते.