अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- आमदार आशुतोष काळे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर कोपरगाव शहराला एक अनोखी मात्र महत्वपूर्ण भेट दिली आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी 120 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना आमदार काळे म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत आपण शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
त्याचे फलित म्हणून या 120 कोटी रुपये खर्चाच्या योजनेस आज तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण याप्रश्नी उपोषण देखील केले होते. निवडणुकीत जनतेने आपल्या बाजूने कौल दिला.
पहिल्या दोनच महिन्यांत पाच क्रमांकाच्या साठवण तलावाची बरीचशी खोदाई ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेवरून, संबंधित ठेकेदार कंपनीने विनामूल्य केली. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनेस तांत्रिक मंजुरी देखील दिली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













