नेवासा पोलीस ठाण्याच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी मंजूर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  नेवासा पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीला आली आहे. या इमारतीची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील,

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते.

गृहमंत्री वळसे पाटील नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी ते म्हणाले, ‘सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याकडे पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रीत कराव्या.

तसेच ‘जिल्हा पोलिसांनी सुरु केलेली ई-टपाल प्रणालीचे काम चांगले असून भविष्यात राज्यातही हा प्रयोग राबविण्यात येईल.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जिल्ह्यातील पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe