वाद चव्हाट्यावर! शिवसैनिकांने दिला शिवसेनेच्या पदधिकऱ्याला इशारा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहे. यामुळे दरदिवशी काहीतरी राजकीय चर्चाना उधाण येत आहे.

यातच आता हा वाद एवढा विकोपाला गेला आहे कि, एका शिवसैनिकाने चक्क दुसऱ्या शिवसेनेच्या पदधिकाऱ्याला थेट इशाराच दिला आहे. नगरसेवक गणेश कवडे आणि माजी नगरसेवक संजय शेंडगे यांनी शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख काका शेळके यांना हा इशारा दिला आहे. त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, की गेल्या काही दिवसांपासून नगर शहर शिवसेनेमध्ये फुट पाडण्याचे काम काही स्थानिक पदाधिकारी करत आहेत. सावेडी येथील काका शेळके यांनी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेने कुठलेही अधिकृत पद दिलेले नाही, ते स्वंयघोषीत पदाधिकारी म्हणून मिरवत आहेत.

पक्षात फुट पाडण्याचा त्यांनी व त्यांच्या पक्षबदलू साथीदारांनी विडा उचलला आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून शेळके यांनी स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडणुकीत मराठा समाजास विरोध दर्शविला. त्यावर आक्षेप घेतला असता त्यांनी माझ्यासह काही नगरसेवकांवर विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याची टीका केली शेळके यांच्यात हिम्मत असेल,

तर त्यांनी समोरा समोर स्टेजवर पुरावे घेऊन यावे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळूनही त्यांचा 1 हजार 600 मतांनी लाजिरवाणा पराभव झाला. राठोड यांना सर्वात कमी मते शेळके यांच्याच प्रभागात पडले. तरीही सावेडीत राठोड यांना जास्त मते मिळाल्याचे धादांत खोटे बोलत आहेत.

ज्यांचा जन्म इतर पक्षात झाला ते सारसनगर, बुर्‍हाणनगर करून थकले आणि आता केडगावच्या नादी लागले. आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांना वेळोवेळी फुटणार्‍यांनी शिकवू नये. यापुढे कुठलेही चुकीचे पत्रक काढल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा नगरसेवक गणेश कवडे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment