कॉपी प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर धुडगूस घालणाऱ्या कॉपी प्रकरणातील सर्वच आरोपींना प्रशासनाने तत्काळ अटक करावी,

अशी मागणी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेच्या शनिवारी (दि. ३०) रोजी शेवगाव तहसीलदारांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता दहावीच्या भूगोलच्या परीक्षेवेळी बालमटाकळी येथील उपकेंद्रात घुसून आरोपींनी परीक्षेच्या कामकाजात अडथळा निर्माण करून पर्यवेक्षक यांना अर्वाच्य भाषेत बोलल्याने परीक्षा केंद्रात काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

या वेळी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अरविंद देशमुख, जिल्हा कार्यवाहक संजय भुसारी, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास जाधव, गोविंद वाणी, ऑल इंडिया युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक कॉ. संजय नांगरे,

शिक्षक भारतीय संघटनेचे अशोक उगलमुगले, महादेव काटे, प्राचार्य विक्रम खैरे, राजेंद्र पानगव्हाणे, संजय मरकड, प्रा. नितीन मालानी, बाळासाहेब कोकरे, अप्पासाहेब उभेदळ, टाकळकर बी. आर, आरगडे डी. आर, शिंपी आर.बी, माळी ए. एस., रणसिंग डी.पी., ज्योतीक आर.एल., झाडे एन. सी., समाधान आराख,

आत्माराम दहिफळे, राजळे ए. आर. आदींसह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेवेळी काही गुंडाकडून शिक्षकांना दमबाजी करणे, परीक्षा चालू असताना एकत्रित जाऊन विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणे,

केंद्रात धुडगूस घालणे, ही घटना अतिशय निंदनीय असून, या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करत असून, सदर घटनेतील सर्व आरोपींना प्रशासनाने तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसे न झाल्यास आम्ही सकल शिक्षक संघटनांच्या वतीने बोर्डाच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकू असा इशारा माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe