‘त्या’ पतसंस्थेच्या एजंटला अटक करा; अन्यथा पोलिस अधीक्षक दालनात अर्धनग्न उपोषण करणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा पतसंस्थेचा एजंट रामदास भाऊराव क्षीरसागर (महाराज) यास आरोपी करून अटक न केल्यास

20 डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय दालनात अर्धनग्न उपोषण करणार असल्याचा इशारा मुकुंद रसाळ व इतर ठेवीदारांनी दिला आहे.(Raosaheb Patwardhan)

याप्रकरणी ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देखील दिले आहे. दरम्यान या निवेदनात म्हटले आहे की, रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा पतसंस्थेविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना 2 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.

मात्र रामदास क्षीरसागर (महाराज) हे अद्याप फरार आहेत. ठेवीदारांनी दिलेल्या जबाबानुसार क्षीरसागर यास सहआरोपी करून अटक करण्यात यावी.

तसेच व्यवस्थापक रत्नाकर बडाख यांना अटक करण्यात यावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या या निवेदनावर 15 ठेवीदारांच्या सह्या आहेत.

वरील मागण्या मान्य न झाल्यास 20 डिसेंबर रोजी एसीपी कार्यालयात अर्धनग्न उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe