अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- तुझ्या आजी-आजोबांनी आमचे पैसे दिले नाही तर तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला डांबून ठेवल प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एक पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या आजी आजोबा सोबत राहुरी तालुक्यात कामासाठी आली असताना तिचे आजी आजोबा मकर संक्राती साठी गावाकडे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत असणारा
ट्रॅक्टर चालक पिंटू माळी हा त्या मुलीला म्हणाला की तुझे आजी – आजोबा येथून निघून गेले आहेत त्यांना येऊ पर्यंत तू दुर्गापूर तालुका राहाता येथील पापा भाई यांच्या घरी जायचे आहे व तुझे आजी-आजोबा आमचे पैसे दिले नाही तर तू पापा भाईशी लग्न कर असे सांगून पिंटू माळी याने त्या अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर बसवून पापा भाई कडे नेऊन सोडले
त्यानंतर १६ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यंत ती अल्पवयीन मुलगी पापा भाईच्या घरी असताना पापा भाई तिला म्हणतात की तुझ्या आजी-आजोबांनी आमचे पैसे दिले नाही तर तू माझ्याशी लग्न कर असे म्हणून त्या अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी हात लावत असे
त्यानंतर त्या मुलीची तब्येत खालावल्याने पापाभाईने त्या मुलीच्या मेहुण्याला फोन करून सांगितले की तुझ्या मेव्हणी ची तब्येत खराब झाली आहे तिला तिला इथून घेऊन जा असे सांगितले त्यानंतर त्या मुलीवर कोल्हार येथील खासगी दवाखान्यात उपचार केले.
पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी पिंटू माळी राहणार दरेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव तसेच पापा भाई राहणार दुर्गापुर तालुका राहता दोघांचे पूर्ण नाव माहित नाही यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करत आहेत
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम