अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar News :- पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच शाळेची मान्यता देखील काढून घेतली जाईल.
असा थेट इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मराठीचा पेपरफुटीची घटना घडली होती.
ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. सध्या राज्यात दहावी बोर्डाच्या परिक्षा सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी हे भाष्य केले आहे.
पुढे शिक्षणमंत्री म्हणाल्या की, शाळेत कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळेला यापुढे केंद्र दिले जाणार नाही. पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल.
करोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होत आहे. बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये उशिरा येणार्या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याची घटना समोर आली.
त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, तसेच एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत.
शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात या वेळी दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त अधिक देण्याची विनंती आम्ही केलेली आहे, असे गायकवाड म्हणाल्या.