Ahmednagar News : गावची गरज ओळखून विकास कामे केली पाहिजेत. आपले शासन आल्याने दीड दोन वर्षात मोठा निधी प्राप्त झाला. २०१९ मध्ये भरपूर पाऊस झाल्याने रस्ते बिकट झाले होते. मात्र, शिंदे – फडणवीस शासन येताच या रस्त्यांसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला.
रस्ते दर्जेदार होत नाही, असा विरोधक अपप्रचार करतात, याबाबत त्यांनी क्वालिटी कंट्रोलकडे अर्ज करावा, त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी स्वतः करेन. दर्जेदार काम होत नसेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिला.
तालुक्यातील खरडगाव सुसरे यांना जोडणाऱ्या नांदणी नदीवर ३ कोटी ६८ लाख रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम व ४ कोटी ९१ लाख खर्चाच्या लखमापुरी प्रभुवाडगाव ते मडका रस्ता डांबरीकरण कामांचा भूमिपूजन समारंभ आ. राजळे यांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी त्या बोलत होत्या.
आ. राजळे म्हणाल्या की, ताजनापुर योजनेचे पाणी प्रत्यक्षात पाहिल्याने समाधान मिळत आहे. कित्येक वर्षांपासुन आपण ताजनापुर योजना ऐकतो, आता प्रत्यक्षात पाणी पाहण्याचे समाधान मिळाले आहे. या योजनेस ३० ते ३५ कोटी रुपयांचा निधी आला,
आणखीही निधीची मागणी केली आहे. जी योजना ज्या गावांसाठी आहे, ती पूर्ण व्हावी हा आपला हेतू आहे. नंतर इतर गावांचा समावेश होऊन राखीव पाणी मिळावे. उर्वरीत गावांचे राजकारण केले जाते, नारळ फोडले जातात. सध्या जो सव्हें सुरु आहे, त्यास मोठा कालावधी जाणार आहे;
पंरतु निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही गोष्टी करू नये, कारण त्यामुळे जनतेत संभ्रम निर्मान होतो. गत निवडणुकीत कोणत्या गावातून किती मते मिळाली, याचा विचार न करता आपण विकास कामे केली, येणाऱ्या निवडणुकीत विकास कामांवर सहकार्य करण्याची अपेक्षा आ. राजळे यांनी या वेळी व्यक्त केली.
शेवगाव -पाथर्डीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन ५० किमी. रस्ते पूर्ण झाले तर २५ किमी. रस्त्यांना मंजुरी मिळाली असलाची माहिती त्यांनी दिली. प्रास्ताविक डॉ. मल्हारी लवांडे यांनी केले. आभार माऊली खबाले यांनी मानले.
कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, बापुसाहेब भोसले, भिमराज सागडे, बापुसाहेब पाटेकर, मा.पं. स. सदस्य ज्ञानेश्वर बोडखे, बबनराव लबडे, ज्ञानेश्वर बोडखे, संतोष बोडखे, उपसरपंच प्रविण गायकवाड, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब डावरे, तुकाराम बोडखे, माजी उपसरपंच महादेव लबडे, मा. सरपंच विष्णुपंत बोडखे, ग्रा.पं. सदस्य संतोष बोडखे, शिवकन्या लबडे, मंदा सरसे, ग्रा.पं. सदस्य सुवर्णा लवांडे,
बबनराव लबडे, भाऊसाहेब बोडखे, श्रीकृष्ण बोडखे, प्रभाकर बोडखे, गोरक्ष भोसले, भानुदास नन्नवरे, बंडु बोडखे, हनुमान बोडखे, गोविंद ठोंबरे, जगन्नाथ ठोंबरे, शामराव ठोंबरे, प्र. गटविकास अधिकारी डॉ. सुरेश पाटेकर, उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, शाखा अभियंता राठोड, तुषार पुरनाळे, वरुरचे सरपंच सचिन म्हस्के, श्रीकांत मिसाळ, दादासाहेब कंठाळी, बाबासाहेब किलबिले, नारायण काकडे आदी उपस्थित होते.