Onion News : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा. सुजय विखे यांनी आभार मानले आहेत.
त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांद्यावरील निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवल्याने पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर, पाडळी, चितळी, हनुमान टाकळी व परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार सुजय विखे यांचे आभार मानले आहेत.
कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना कांदानिर्यात बंदी निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.
या पार्श्वभूमीवर खा. सुजय विखे व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतअमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जवळपास पन्नास हजार टन कांदा एकट्या बांगलादेश साठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर खा.र सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याने आपण या भागाचा खासदार म्हणून याबाबत भूमिका मांडली. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विजय झाला आहे, असे मत सचिन म्हस्के, अकुंश डांभे, अविनाश पवार, संतोष कदम, बाबासाहेब आमटे, हरी वाघ शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.