अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती सौ.संगीता शिंदे यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या गटनेत्याडॉ. वंदना मुरकुटे यांची निवड निश्चित मानली जात असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सन 2017 मध्ये चुरशीच्या झालेल्या श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉ. वंदना मुरकुटे, अरुण पाटील नाईक, विजय शिंदे व संगीता शिंदे असे चार अधिकृत सदस्य विजयी झाले.
पुढे सभापती निवडीच्यावेळी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आठ सदस्यीय असणार्या पंचायत समितीमध्ये डॉ. वंदना मुरकुटे व संगीता शिंदे या दोन महिला सदस्यांना संधी प्राप्त झाली.
काँग्रेस पक्षाच्या सभापती पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. वंदना मुरकुटे यांना घोषित केले असताना ऐनवेळी संगीता नाना शिंदे यांनी विरोधी सदस्यांची मदत घेऊन सभापती पद मिळवले.
त्यामुळे शिंदे यांच्या विरोधात पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी या आशयाची याचिका मुरकुटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
या संदर्भात सभापती शिंदे यांनी वेळोवेळी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय येथे आव्हान दिले होते. मात्र दोन्ही ठिकाणी सभापती शिंदे यांना दिलासा मिळाला नाही.
त्यामुळे नुकतेच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सभापती सौ. संगीता सुनील शिंदे यांना आपात्र घोषित केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम+