उन्हाचा चटका वाढताच भाजीपाल्याचा बसला झटका; बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा

Ratnakar Ashok Patil
Published:

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगरच्या बाजारात भाजीपाला महागला आहे.पालेभाज्या तर महागल्या आहेतच परंतु, फळभाज्याही मोठ्या प्रमाणावर महागल्या आहेत. ग्रामीण भागात पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पालेभाज्या पिकविणे कमी केलेले आहे. त्यामुळे बाजारात आपोआप पालेभाज्यांचे प्रमाण कमी झालेले आहे.

याचे पर्यवसन पालेभाज्यांच्या भाव वाढीत झालेले आहे. पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना चढ्या भावाने तो खरेदी करावा लागतो. मेथी तसेच शेपू, पालक, करडईने भाव खाल्ला आहे. ग्रामीण भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे. गवार, हिरवी मिरची, शेवगा, लसून, आद्रक, काकडी आता तेजीत आहेत.गवारचे बाजार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत.

टोमॅटो, वांगी, कोबी, बटाटा, फ्लावर या भाज्याही आता महाग झाल्या आहेत.नगरच्या बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी कमी झालेले आहे.यामुळे बहुतेक भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे.त्यामुळे पालेभाज्यांचे प्रमाणही कमी झालेले आहे.

येथील बाजार समितीत मिळालेले दर पुढीलप्रमाणे : टोमॅटो २०० ते १३००, वांगी ५०० ते २५००, प्लावर २०० ते २०००, कोबी २०० ते ७००, काकडी ३०० ते १८००, गवार ६००० ते १४०००, घोसाळे १००० ते ३०००, दोडका १००० ते ६०००, कारले १००० ते ५०००, हळद ४५०० ते ४०००, कैरी ५००० ते ६५००, भेंडी १२०० ते ४०००, वाल १००० ते ३५००, घेवडा १५०० ते ५०००, तांदुळे १५०० ते ५०००, डिंगरी १००० ते २५००, बटाटे ३०० ते २३००, लसून १८०० ते १६०००, हिरवी मिरची २००० ते ६०००, पकांडा १००० ते ३५००, आवळा २००० ते ५५००, शेवगा १००० ते ४०००, ढेमसे २५०० ते २५००, लिंबू १५०० ते ५५००, आद्रक १५०० ते २३००, गाजर १०० ते १८००, दुधी भोपळा ५०० ते १५००, मका कणसे २००० ते २०००, शिमला मिरची ८०० ते ६०००, मेथी १००० ते १८००, कोथंबिर १२०० ते २४००, पालक ८०० ते १२००, करडई भाजी १६०० ते २०००, शेपू भाजी ८०० ते १२००, पुदीना १५०० ते २४००, चवळी ३००० ते ३५०००, बीट १५०० ते ३०००, हरभरा १००० ते १२००, वाटाणा १००० ते ३०००, डांगर ६०० ते १०००, कांदा पात २००० ते ३५००, बांलंटी १५०० ते ४०००.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe