Ahmednagar News : विकास कामांवरील स्थगिती उठवल्याने विकासकामे पूर्ववत सुरू : आमदार बाळासाहेब थोरात

Published on -

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील अनेक विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवला होता. मात्र विद्यमान सरकारने या विकास कामांना स्थगिती दिली होती. ही स्थगिती उच्च न्यायालयातून उठवली असून विकासकामे पूर्ववत सुरू झाली आहे,

अशी माहिती आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. तालुक्यातील कुरण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निसार बशीर शेख, उबेद शेख, लक्ष्मणराव कुटे, बी. आर. चकोर, निसार गुलाब शेख, के. के. थोरात, इफ्तीशाम रियाज शेख, योगिता सातपुते, नदीम शेख, भास्कर शेरमाळे, शबीर शेख, इजाज लाला शेख, शेख मुश्ताक ईस्माईल, जावेद महम्मद हुसेन,

प्रभाकर सोनवणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार थोरात म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात कालव्यांना मोठा निधी मिळून कालव्याची कामे पूर्ण केली. उद्घाटनाच्या वेळी ज्यांचे योगदान आहे, अशांपैकी कोणीही नव्हते. श्रेय घेण्यासाठी काहीजण धडपड करत आहे.

मात्र जनतेला खरे माहित आहे. याच काळात तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी साधारण ७५० कोटींचा निधी मिळवला. तर रस्त्यांच्या कामासाठी ही मोठा मोठा निधी मिळवला. मात्र विरोधी पक्षातील आमदारांच्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली.

आता ही स्थगिती हायकोर्टातून उठवली असून कामे सुरू केली आहे. कठीण काळ असला तरी तो जास्त नाही. आगामी काळात सरकार महाविकास आघाडीचेच आहे. मात्र जातीयतेतून होत असलेले ध्रुवीकरण हे लोकशाहीसाठी घातक असून सर्वांनी मतभेद विसरून लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र, या असे आवाहन आमदार थोरात यांनी केले.

याप्रसंगी उबेद शेख म्हणाले, आमदार थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी मिळवला. कुरण गावावर आमदार थोरात यांनी सातत्याने प्रेम केले आहे. शेख यांनी प्रास्ताविक केले. तर निसार शेख यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe